Ad will apear here
Next
रिकाम्या वेळात मोबाइलवर खूप वाचायचंय? ‘बुकगंगा’ची ई-बुक्स, ऑडिओ बुक्स आहेत ना!


संचारबंदीच्या काळात घरी बसून काय करायचं, असा प्रश्न पडल्यानंतर प्रत्येकाने त्यावर आपापलं उत्तर शोधलंय. जो तो आपल्या आवडीचं आणि आपल्याला सुचेल ते वेगळं काम करतोय. कोणी गाणी म्हणतंय, वाद्य वाजवतंय, तर कोणी आपली कला फेसबुक लाइव्हवरून दाखवतंय. कोणी घरात असलेली पुस्तकंही वाचतंय... पण तुम्हाला त्यापेक्षा वेगळी पुस्तकं आणि तीही मोबाइलवर वाचायचीत किंवा ऐकायचीत का? मग त्यासाठी ‘बुकगंगा डॉट कॉम’चा समर्थ पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे. 

‘बुकगंगा’ हे मराठी पुस्तके जगभर घरपोच पोहोचविणारे एक विश्वसनीय नाव आहे, हे तुम्हाला माहिती आहेच. केवळ छापील पुस्तकेच नव्हे, तर ई-बुक्स आणि ऑडिओ बुक्सही ‘बुकगंगा’द्वारे उपलब्ध केली जातात. ‘बुकगंगा’च्या अॅपच्या माध्यमातून या पुस्तकांचा आस्वाद मोबाइलवर, कम्प्युटर/लॅपटॉपवर किंवा अगदी आयपॅडवरही घेता येतो. ‘बुकगंगा’चे ई-बुक रीडर, तसेच ऑडिओ बुक रीडर अॅप बुकगंगा डॉट कॉमवरून, तसेच गुगल प्ले स्टोअरवरून आणि अॅपल अॅप स्टोअरवरून मोफत डाउनलोड करता येते.

आजच्या घडीला ‘बुकगंगा’वर १२ हजारांहून अधिक ई-बुक्स उपलब्ध आहेत. त्यामध्ये कथा-कादंबऱ्यांपासून चरित्रे, आत्मचरित्रांसह आध्यात्मिक, प्रवासवर्णने, पाककला, बालसाहित्य, वैचारिक, जीवनशैली, आरोग्य आदी विविध प्रकारच्या ई-बुक्सचा समावेश आहे. तसेच, मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा वेगवेगळ्या भाषांतील ई-बुक्स त्यात आहेत. 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील सुमारे ५०० ई-बुक्स वाचकांसाठी अगदी मोफत उपलब्ध आहेत. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे समग्र साहित्य, ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाचे जुने अंक, यांसह विविध प्रकारच्या साहित्याचा समावेश आहे. 

वेगवेगळ्या विषयावरील १४० ऑडिओ बुक्सही ‘बुकगंगा’वर उपलब्ध आहेत. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील ‘अनादि मी अनंत मी’ या ध्वनिनाट्यासह ‘बुकगंगा’चे ऑडिओ दिवाळी अंक मोफत उपलब्ध आहेत. 

ही सुट्टी सत्कारणी लावायची असेल, तर ‘बुकगंगा’वरील ई-बुक्स आणि ऑडिओ बुक्सचा आनंद जरूर घ्या आणि तुमच्या मित्रमंडळींनाही याविषयी जरूर सांगा... 

काही लिंक्स :

ई-बुक्स : 
https://www.bookganga.com/eBooks/Books?EB=1

मोफत ई-बुक्स : https://www.bookganga.com/eBooks/Books?FEB=1

ऑडिओ बुक्स : http://audio.bookganga.com/

मोफत ऑडिओ बुक्स : http://audio.bookganga.com/Books?FEB=1

पुस्तक परिचय : https://bit.ly/3bsz450

निवडक पुस्तकांतील काही प्रकरणे : https://bit.ly/33MeYQz

बुकगंगा ई-बुक रीडर डाउनलोड करण्यासाठी : https://www.bookganga.com/eBooks/Home/eBookReader

बुकगंगा ऑडिओ बुक रीडर डाउनलोड करण्यासाठी : http://audio.bookganga.com/Home/eBookReader
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZNPCK
Similar Posts
जोवरी हे जग, तोवरी गीत रामायण : अभिवाचन - डॉ. प्रतिमा जगताप (व्हिडिओ) एक एप्रिल १९५५ रोजी आकाशवाणीवरून गीत रामायणाच्या प्रसारणाला सुरुवात झाली. गदिमा, बाबूजी या जोडीच्या या दैवी आविष्काराने मराठी रसिकांच्या मनात कायमचे घर केलेले आहे. या गीत रामायणाबद्दलच्या काही गोष्टी सांगणारा लेख पुणे आकाशवाणीच्या निवृत्त वरिष्ठ निवेदिका डॉ. प्रतिमा जगताप यांनी ‘कविता स्वरांनी मोहरलेल्या’ या पुस्तकात लिहिला आहे
अस्तित्वाच्या पाऊलखुणा : आरती देवगांवकर - कवितांचे अभिवाचन (व्हिडिओ) आरती देवगांवकर यांचा ‘अस्तित्वाच्या पाऊलखुणा’ या कवितासंग्रहातील कविता मुख्यत्वेकरून काही चिंतनपर अनुभव, स्त्रीविषयक संवेदन आणि कविताविषयक धारणा या तीन आशयसूत्रांभोवती गुंफलेल्या आहेत. या कवितासंग्रहातील काही कवितांचे अभिवाचन करत आहेत स्वतः आरती देवगांवकर आणि त्यांचे पुत्र अमर देवगांवकर..
‘मिळून साऱ्याजणी’च्या वेगळ्या मुखपृष्ठांची कहाणी... ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका विद्या बाळ यांचं ३० जानेवारी २०२० रोजी निधन झालं. स्त्रियांचं आत्मभान जागृत करण्याचं आणि समाजाला स्त्रियांसंदर्भात सजग आणि संवेदनशील बनवण्याचं महत्त्वाचं कार्य त्यांनी आयुष्यभर केलं. ‘मिळून साऱ्याजणी’ हे त्यांनी चालविलेलं मासिक हा त्याच कार्याचा एक भाग होता. या
51 Books And Movies To Enrich Your Life : Manoj Gokhale (Audio) 51 Books And Movies To Enrich Your Life हे मनोज गोखले यांनी लिहिलेले पुस्तक बुकगंगा पब्लिकेशन्सतर्फे ई-बुक आणि ऑडिओ बुक स्वरूपात प्रकाशित करण्यात आले आहे. नावात म्हटल्याप्रमाणेच, गोखले यांनी या पुस्तकात जीवन समृद्ध करून टाकणारी ५१ पुस्तके आणि चित्रपट यांच्याबद्दल लिहिले आहे. या पुस्तकाबद्दल सांगत आहेत स्वतः मनोज गोखले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language